गढी किंवा गुप्तधनात मिळालेल्या सोन्याच्या नकली गिन्न्या खऱ्या असल्याचे भासवून गंडविण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना शहर पोलिसांनी गुरुवारी सापळा रचून अटक केली. आरोपींकडून नकली सोन्याच्या गिन्न्या व एक धारदार शस्त्र जप्त करण्यात आले.
नकली सोने विकण्याचा प्रयत्न होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार उत्तम जाधव यांनी सकाळपासूनच गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना मोहिमेवर पाठविले होते. दरम्यान, सायंकाळी ५ वाजता नकली सोने विकण्याच्या प्रयत्नात असलेले दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या नजरेस पडले. हे दोघे व्यावसायिकाला ठरविण्यासाठी शोध घेत होते. एवढय़ात पोलिसांनी सापळा रचून एकाला व्यावसायिक बनवून त्यांच्याजवळ पाठविले. त्यानंतर पोलिसांचा अंदाज खरा ठरला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याजवळ नकली सोन्याच्या ५७५ ग्रॅम वजनाच्या शंभरहून अधिक गिन्न्या व धारदार चाकूही सापडला. पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे रावसाहेब सदाशिव पवार (२२, रा. लाखनवाडा) व रघु दादाराव पवार (२५, रा.अंत्रज) अशी आहेत.
गेल्या आठवडय़ात संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील विजय वर्मा यांना याच दोघांनी अशाच प्रकारचे नकली सोने देऊन २ लाखाने गंडविले होते. त्यामुळे आरोपींकडून अनेक फसवेगिरीच्या प्रकरणांची माहिती उघड होऊ शकते, असे ठाणेदार उत्तम जाधव यांनी सांगितले. या आरोपींवर खून, दरोडा, घरफोडी, लुटमार असे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कावरे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरपालसिंह राजपूत, संतोष धनोकार यांनी सहभाग घेतला.
खामगावात नकली सोने विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक
गढी किंवा गुप्तधनात मिळालेल्या सोन्याच्या नकली गिन्न्या खऱ्या असल्याचे भासवून गंडविण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना शहर पोलिसांनी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-01-2014 at 07:21 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two arrested in attempt of sell fake gold