लोकलच्या दारात उभे राहणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांच्या हातातील पिशवी, घडय़ाळ, सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या मंगेश ढुमणे (वय २०) व एका अल्पवयीन मुलाला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
मंगेश हा भोपर गावात राहतो. कोपर आणि दिवा रेल्वे मार्गाच्या मध्ये काही तरुण लोकलच्या दारात उभे असलेल्या प्रवाशांच्या हातावर फटके मारून वस्तू चोरणे, त्यांना लुटण्याचे प्रकार करीत असल्याच्या तक्रारी डोंबिवली रेल्वे पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. पूजा बागकर व संजय हतोडे यांचे मोबाइल अशाच पद्धतीने चोरण्यात आले होते.
पोलिसांनी कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली. एक जण प्रवाशाच्या हातावर फटका मारायचा तर दुसरा प्रवाशाच्या हातामधील खाली पडलेली पिशवी, वस्तू घेऊन पळून जायचा, अशी पद्धत या दोघांनी विकसित केली होती, असे पोलीस निरीक्षक महेश बागवे यांनी सांगितले.

Story img Loader