नगरपरिषदेची सत्ता शहर विकास आघाडीने पुन्हा काबीज केल्यानंतर वर्षभरात दोन कोटी १४ लाख २४ हजार रुपयांची विविध कामे केल्याची माहिती नगराध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी दिली.
सर्वाच्या सहकार्याने अनेक प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आले. त्याचा पाठपुरावा केल्याने १५ कोटी रुपयांचा अल्पसंख्यांक वस्ती विकास निधी प्राप्त झाला आहे. २० लाख रुपयांचे सौर दिवे मंजूर झाले आहेत. सहा कोटी रुपयांचे रस्ते, गटारी, पाणी पुरवठा योजना आणि पायाभूत सुविधा तसेच घरकुल योजनेला निधी मिळावा म्हणून प्रस्ताव सादर केल्याचे अॅड. पाटील यांनी सांगितले. रस्ते व गटारी सफाईसाठी २४ लाख ७५ हजार रुपयांची यंत्रणा घेण्याचा प्रस्ताव देखील दिला असल्याचे त्यांनी सांगितले. पालिका उद्यानात झालेल्या या पत्रकार परिषदेला माजी आमदार कैलास पाटील, चोपडा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अॅड. घनश्याम पाटील, उपनगराध्यक्ष विकास पाटील, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, जळगाव जनता सहकारी शेडय़ुल बँकेच्या शाखेचे उद्घाटन नगराध्यक्ष अॅड. संदीप पाटील व ज्येष्ठ उद्योजक विठ्ठलदास गुजराथी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष संजय बिर्ला, संचालक दिलीप पाटील, वामन साखरे, डॉ. प्रताप जाधव, विद्या नाईक, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवर अतिथी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक यांचा सत्कार बँकेच्या वतीने करण्यात आला.
प्रास्तविक दिलीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन वामन साखरे यांनी केले. शाखाधिकारी हेमराज पगारे यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा