पोलिसांची नाकाबंदी चुकविण्याच्या प्रयत्नात सांगलीतील तडीपार नामचीन गुंड बंडय़ा दडगे याच्या स्विप्ट गाडीची मारुती कारशी समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे जण ठार तर १२ जण जखमी झाले.  मध्यरात्री झालेल्या अपघातानंतर बंडय़ा दडगे उपचारासाठी स्वतहून शासकीय रुग्णालयात दाखल झाला तर अन्य जखमींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले.
तडीपार असणारा गुंड बंडय़ा दडगे हा कोल्हापूरकडून मारुती स्विप्ट (एम.एच.१०/बीएम.५९९९) या गाडीने आपल्या पत्नीला घेऊन सांगलीकडे येत होता. पुढे आकाशवाणीजवळ पोलिसांनी नाकाबंदी केलेली होती. आता आपल्याला पोलीस पकडणार या भीतीने त्याने हिरो होंडा मोटरसायकल (एम.एच.१०/बीके.१२०९) गाडीला पाठीमागून जोरदार धडक देऊन गाडी कोल्हापूर दिशेने सुसाट वेगाने वळून जात असताना कोल्हापूरकडून सांगलीकडे जाणारी मारुती कार  (एम.एच.४४/बी.२३२८) या गाडीला जोरदार समोरासमोर धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की त्या गाडीतील संजय सखाराम कदम (वय ६०) व सौरभ शिवाजी कदम (वय ७) या  दोघांचा जागीच मृत्यू झाला. गुंड बंडय़ा दडगे याने जखमी अवस्थेत परस्पर उपचारासाठी शासकीय रुग्णालय गाठले. या अपघातात १२ जण जखमी झाले. अपघातग्रस्तांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहेत. त्या अपघातातील गाडी गुंड दडगे याची असल्याची खात्री करून पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयातच ताब्यात घेतले.
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की तडीपार असणारा गुंड बंडय़ा दडगे हा सांगलीकडे कोल्हापूरकडून येत होता. पोलिसांनी आकाशवाणीच्या ठिकाणी नाकाबंदी केली होती. आता पुढे नाकाबंदी असल्याने पोलिसांच्या तावडीत आपण सापडणार असल्याची भीती तडीपार गुंड बंडय़ा दडगे याला होती. त्याने नाकाबंदीच्या ठिकाणी पाठीमागून हिरो होंडा मोटरसायकल गाडीला धडक दिली. कोल्हापूरच्या दिशेने गाडी सुसाट वेगाने नेत असताना कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या मारुती कारला जोरदार समोरासमोर धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की या अपघातात गाडीतील संजय सखाराम कदम (वय ६०) व सौरभ शिवाजी कदम (वय ७) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांना उपचारासाठी मिरज मिशिन रुग्णालयात दाखल केले असता. त्यांना अगोदरच डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले.
या अपघातात तडीपार गुंड बंडय़ा दडगे व पत्नी संगीता दडगे (वय ३१) हे दोघेही जखमी झालेले आहेत व उपचारासाठी शासकीय रुग्णालयात स्वत: दाखल झालेले आहेत.
  आकाशवाणीजवळ मारुतीकार व मारुती स्विप्ट यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेच्या आवाजानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मारुती कार मधील अपघातग्रस्तांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मदत केली. अपघातातील जखमी दीपा संजय कदम (वय ४०), शांता सखाराम कदम (वय ६०), शिवाजी सखाराम कदम (वय ४०), संकेत संदीप कोले (वय १३), ओमकार संजय कदम (वय १०), राणी शिवाजी कदम (वय ३०), प्रियांका संजय कदम (वय १५), संदीप अशोक कोले (वय ३९ रा. गावभाग), अजित दत्तात्रय शेवाळे (वय ३०, रा.गावभाग), अमोल कदम (वय १९), दिनकर दत्ता कदम (वय ५४, रा.एकता  कालनी) या अपघातात जखमी झालेले आहेत. यांना उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. हे सर्व जखमी सांगलीवाडी येथील आहेत.

Story img Loader