विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलने दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात राळेगावचे भाजपचे तालुका अध्यक्ष आणि यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक वामनराव वाघमारे (४५) यांच्यासह दोघे जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
वामनराव वाघमारे आणि त्यांचे मित्र नरेंद्र खेकारे (३६) हे दोघे एम.एच. २९ व्ही ७१५४ क्रमांकाच्या हीरोहोंडा मोटारसायकलने यवतमाळहून राळेगावकडे जात होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम.एच. ३१ एएम १८४० क्रमांकाच्या मोटारसायकलची जबर धडक होऊन वामनराव वाघमारे आणि नरेंद्र खेकारे हे दोघेही जागीच ठार झाले, तर दुसऱ्या मोटारसायकलवरील रसुल रहिमतुल्ला व राहुल पारिसे हे २२ वर्षीय तरुण गंभीार जखमी आहेत. त्यांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही झाडगावचे राहणारे आहेत. वाघमारे आणि खेकारे यांच्या पार्थिवावर राळेगावजवळील रावेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two died in accident