दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघेजण जागीच ठार झाले. जिल्हय़ातील घाटसावळीजवळ बुधवारी सायंकाळी हा अपघात झाला. बीड-परळी राज्य रस्त्यावर सिद्धेश्वर रामेश्वर नाईकवाडे (वय २३, खेर्डा, तालुका गेवराई) हा तरुण दुचाकीवरून (एमएच २३ ५२२) घाटसावळीवरून बीडकडे येत होता. गोिवद गुलाब सोनवणे (वय २४, अंबाजोगाई) दुचाकीवरून (एमएच ४४ ९४९०) बीडहून अंबाजोगाईकडे जात असताना दोन दुचाकींची घाटसावळीजवळ समोरासमोर धडक झाली. यात हे दोघेही ठार झाले, तर अनिल दोहाडकर हा जखमी झाला.

Story img Loader