ऊध्र्व पेनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडल्याने हिंगोली-पुसद रस्त्यावरील पुलावरून दोन फुटांपर्यंत पाणी वाहत आहे. परिणामी गुरुवारी दुपारी चापर्यंत या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. गोळबाजार, शेंबाळपिंपरी गावांदरम्यान हा पूल आहे.
इसापूर धरणातून बुधवारी सायंकाळी ६ वाजता ४ दरवाजे एक मीटर उंचीपर्यंत, तर ९ दरवाजे दीड मीटपर्यंत वर उचलण्यात येऊन १ हजार ४५४.५० प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. इसापूर धरणात अजूनही आवक सुरू असून पाऊस वाढला तर पाणलोटक्षेत्रात सांडव्याद्वारे सोडण्यात येणारा विसर्ग वाढवावा लागेल, असे ऊध्र्व पेनगंगा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी नांदेड येथील अधीक्षक अभियंत्यांना कळविले आहे. सिद्धेश्वर धरणात गुरुवारी ७३.८१ टक्के पाणीसाठा होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा