वसमत तालुक्यातील गिरगाव येथील मुक्ता नादरे व अनसूया वाघमारे या दोन विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी आरोपी विजय कांबळे व शे. माजिद शे. मेहबूब यांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या दोन्ही मुली बारावीच्या वर्गात शिकत होत्या. दोघीही गुरुवारी परीक्षेला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांचे मृतदेह पूर्णा नदीच्या बंधाऱ्यात सापडले. शवविच्छेदन अहवालात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे. त्यांचा व्हीसेरा प्रयोगशाळेत पाठवला. या प्रकरणी अटक केलेल्या विजय कांबळे व शे. माजिद शे. महेबूब यांना रविवारी पूर्णा न्यायालयासमोर उभे केले असता दोघांना दि. १८पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.   

Story img Loader