चंद्रपूर जिल्ह्य़ातील धाबा वनपरिक्षेत्रात कुत्र्यांच्या हल्ल्यात अस्वलाच्या दोन पिल्लांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्य़ात एका अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटय़ा ठार ढाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.
चंद्रपूर जिल्ह्य़ातील गोंडपिंपरी तालुक्यांतर्गत येणाऱ्या धाबा गावालगतच्या जंगलात महिला काटक्या वेचण्यासाठी गेल्या असताना त्यांना दोन पिल्ले मृतावस्थेत दिसून आली. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांना दिली. या माहितीच्या आधारावर वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असता अस्वलाची पिल्ले मृतावस्थेत पडून होते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर कुत्र्याच्या हल्ल्यात या दोन्ही पिल्लांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, यवतमाळ तालुक्यातील बेलोना शिवारात एका बिबटय़ाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. यवतमाळ-नागपूर महामार्गावरील बेलोनाजवळ एका नाल्यात बिबटय़ा मृतावस्थेत पडलेला काही लोकांच्या दृष्टीस आढळला. त्यांनी सहायक वनरक्षक अविनाश गणमोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.के. पटवारी, पोलीस निरीक्षक दिनेश ठोसरे यांना ही घटना कळविली. वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. कळंब येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.के.डी.देशभ्रतार व डॉ.एन.जी. रामगडे यांनी बिबटय़ाचे शवविच्छेदन केले. बिबटय़ाचे वय २ वर्षे असल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कळंब-दत्तापूर मार्गावरील वनविभागाच्या नर्सरीत बिबटय़ावर अंत्यसंस्कार करण्यात
आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा