आकुर्डी व देहूरोड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान असलेल्या भुयारी पुलाच्या कामासाठी पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या दोन लोकल १३ जानेवारीपासून पुढील दहा दिवस अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. या लोकल चिंचवड स्थानकापर्यंतच सोडण्यात येतील, असे मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
लोणावळ्यावरून दुपारी दोन वाजता सुटणारी लोकल लोणावळा ते चिंचवड दरम्यान रद्द होणार असून, ही लोकल चिंचवडपासून पुणे स्थानकापर्यंत धावेल. त्याचप्रमाणे पुणे स्थानकावरून दुपारी एक वाजता सुटणारी लोकल चिंचवडपर्यंतच धावणार आहे.

Story img Loader