नांदगाव तालुक्यात महिला व विद्यार्थिनीच्या छेडछाडीचे दोन प्रकार घडले असून या प्रकरणांमध्ये एका ठिकाणी अल्पवयीन मुलाविरूद्द कारवाई करण्यात आली. तर, दुसऱ्या प्रकरणात शिक्षकाविरूध्द कारवाई करण्याच्या मागणीसाठी भालूर येथे शाळा बंद ठेवण्यात आली.
मनमाडमधील शिवाजीनगर येथे नाईक हायस्कूल परिसरात रात्रीच्या सुमारास विवाहितेची १७ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलाने  अश्लिल अपशब्द वापरून छेड काढली. या आरोपावरून त्या मुलाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची बाल न्यायालयात रवानगी करण्यात आली आहे.
छेडछाडीची दुसरी घटना भालूर येथे घडली. भालूर वस्ती शाळेवरील शिक्षकाने चौथीच्या मुलीची छेड काढल्याची घटना घडली त्या शिक्षकाविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी शाळा बंद करून केंद्र प्रमुखांना तक्रारींचे निवेदन दिले.
त्यावर शिवाजी ढगे, भाऊसाहेब आहेर, अशोक निकम यांच्यासह ग्रामस्थांची स्वाक्षरी आहे. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन जबाब नोंदविले व तक्रारीचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. पुढील निर्णय होईपर्यंत या शिक्षकाने शाळेत जाऊ नये अशी नोटीस शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावली आहे.

Story img Loader