ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागात सोमवारी सकाळी दोन अर्भके आढळली असून हे दोघेही मुलगे आहेत. त्यापैकी एक अर्भक जिवंत असून त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
ठाणे येथील चेंदणी कोळीवाडा, दत्तमंदीर परिसरातील एका इमारतीजवळ साडीमध्ये एका जिवंत अर्भकाला गुंडाळून ठेवण्यात आले होते. या संदर्भात येथील एका नागरिकाने माहिती देताच ठाणे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जिवंत असणारे अर्भक हा तीन ते चार दिवसांचा मुलगा असून त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तसेच इंदिरानगर भागातील नाल्यातही एक दिवसांचे मृत अर्भक आढळले. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Story img Loader