मध्य रेल्वेतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांसाठी २१ ते २९ नोव्हेंबरदरम्यान पंढरपूरमार्गे कोल्हापूर-उस्मानाबाद व कुर्डुवाडी-मिरज या ज्यादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.   कोल्हापूर-उस्मानाबाद ही विशेष गाडी २१ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूरहून सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी निघणार असून रात्री १० वाजून २० मिनिटांनी पंढरपूरला तर, रात्री १ वाजून ५ मिनिटांनी उस्मानाबादला पोहोचेल. तसेच उस्मानाबाद-कोल्हपूर ही विशेष गाडी २२ ते २९ नोव्हेंबरदरम्यान उस्मानाबादवरून पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी पंढरपूरला तर, सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल.
 मिरज – कुर्डुवाडी ही विशेष रेल्वे २१ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत मिरजहून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी निघून सकाळी ८ वाजून ४७ मिनिटांनी पंढरपूरला तर, सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी कुर्डुवाडीला पोहोचणार आहे. कुर्डुवाडी-मिरज ही गाडी कुर्डुवाडीवरून दुपारी ११ वाजून ५० मिनिटांनी सुटून दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी पंढरपूला पोहोचेल.
या विशेष गाडीमध्ये आठ द्वितीय श्रेणी आरक्षित शयनयान, एक थ्री टायर एसी व टू टायर एसी तसेच, तीन द्वितीय श्रेणी व दोन एसएलआरसह एकूण १५ डब्यांची सोय करण्यात आली आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा