कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील शेत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. कळमनुरी येथील इंदिरानगर येथे राहणारे मंगेश अशोक लाटे (वय १६) व चंद्रशेखर केशव लांडगे (वय १७) हे दोघे बुधवारी धानोरा येथे असलेल्या सावंत यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक हनुमंत वाकडे घटनास्थळी पोहोचले.

Story img Loader