महानगरपालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची १० डिसेंबर रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
जुने अमळनेर स्थानकाजवळ सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ चांगलेच घसरल्याने त्या पाश्र्वभूमीवर महापालिका निवडणुकीसाठी होणाऱ्या या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे. या सभेत ते शिवसेनेच्या वचननाम्यावर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अकार्यक्षमतेवर प्रकाशझोत टाकण्याची शक्यता आहे. या सभेला धुळेकरांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विजय रावराणे, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे, उपजिल्हाप्रमुख हिलाल माळी आदींनी केले आहे.

Story img Loader