विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दीतील सिडको, एमआयडीसी प्राधिकरणाच्या जागेवर तसेच गावठाण भागात अनधिकृत बांधकामाची चढाओढ सुरू झाली आहे. निवडणुकांच्या कामात पोलीस आणि अधिकारी वर्ग व्यस्त झाल्याने नवी मुंबईत भूमाफियांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून शहरातील एमआयडीसी, गावठाण, सिडको भागातील अनधिकृत चाळी, इमारती उभारण्याचा सपाटा सुरू केला आहे.
दिघा, इलठण पाडा, यादव नगर, सुभाष नगर, ऐरोली, दिवागाव, घणसोली, कोपरखरणे, जुई नगर, तुभ्रे, बोनकोडे येथील गावठाण भागात तसेच उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली अनधिकृत बांधकामे सुरू केली आहेत. या बांधकामांना महापालिका कर्मचारी अधिकारी यांचाही आशीर्वाद असल्याचे स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात येते. पहाटे तीन ते सहा या वेळेत बांधकामाच्या ठिकाणी रेतीचे ट्रक रिकामे केले जातात. त्यानंतर दिवस-रात्र पाळी पद्धतीने ही अनधिकृत बांधकामे भूमाफियाकडून उभारण्यात येत आहेत. या बांधकामामध्ये स्थानिक नगरसेवक, अधिकारी, मध्यस्थ दलाल यांनाही खारीचा वाटा मिळत असल्याने तेही याविषयी मूग गिळून गप्प बसत आहेत. मुंब्रा परिसरात झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर नवी मुंबईतील बिल्डर आणि अधिकारी, राजकीय पुढारी काही तरी बोध घेतील आणि जीवघेण्या अनधिकृत बांधकामांना आळा घालतील असे अपेक्षित असताना ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असे म्हणत हातात हात घालत अनधिकृत बांधकामाचे इमले उभे ठाकत आहेत. सिडको व एमआयडीसीच्या जागेवर संरक्षक कुंपण घालण्याची सौजन्यता अधिकाऱ्यांनी दाखवली नसल्याने भूमाफियांना रान मोकळे मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आचारसंहितेच्या काळात अनधिकृत बांधकामे होत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. परंतु पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने अनधिकृत बांधकामावर सध्या कारवाई करता येत नाही.
अविनाश माळी, उप कार्यकारी अभियंता, एमआयडीसी  

सिडकोच्या आरक्षित जागेवर उभारण्यात येत असलेल्या झोपडय़ा आणि इमारतीवर दिवाळीनंतर कारवाई करण्यात येणार आहे.
अनिल पाटील,
अतिक्रमण अधिकारी, सिडको  