महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित यंदाची राज्य नाटय़स्पर्धा नांदेड केंद्रावर पार पडली. यात लातूरच्या सूर्योदय संस्थेने अॅड. शैलेश गोजमगुंडे लिखित ‘उन्हातलं चांदणं’ या नाटकाचा प्रयोग सादर केला. त्याला स्पध्रेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाबरोबरच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन व अभिनय प्रमाणपत्र शैलेश गोजमगुंडे, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना सुधीर राजहंस, स्त्री अभिनय प्रमाणपत्र अॅड. वैभवी सबनीस तर नेपथ्याचे द्वितीय पारितोषिक निशिकांत जोशी यांना मिळाले. या नाटकासाठी संगीत संयोजनाचे काम विकास केंद्रे, तुकाराम सुवर्णकार, संजय मोरे यांनी पार पाडले.
कौटुंबिक जीवनातील कलहात असंमजपणे वागणाऱ्या माणसाच्या आयुष्याचा शेवट हा विध्वंसाकडे जाणाराच असतो. ही मध्यवर्ती संकल्पना असलेले ‘उन्हातलं चांदणं’ हे समाजजीवनातील प्रत्येकाला अंतर्मुख करणारे, हृदयस्पर्शी नाटक आहे. या नाटकाचा प्रयोग लवकरच लातुरात होणार आहे, असे सूर्योदयच्या वतीने कळवण्यात आले आहे. या नाटकात प्रा. सचिन जगताप, नवलाजी जाधव, पूजा आडे, मयूर बनसोडे, नितीन पुठ्ठेवाड, लक्ष्मण मदने, आकाश रांजणकर, नीलेश जाधव यांनीही महत्त्वाच्या भूमिका रंगवल्या आहेत, तर सचिन उपाध्ये व संतोष साळुंके यांनी सूत्रधाराची भूमिका बजावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा