महानगरपालिकेच्या ताब्यात जमीन नसताना ते रिंगरोडचे काम करणार कसे, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी केला आहे. शहर कार्यकारिणीच्या मासिक बैठकीत ते बोलत होते. पालिकेत मनसेची सत्ता आल्यापासून अनागोंदी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पालिका २५० कोटींच्या रिंगरोडचे काम हाती घेणार असल्याबद्दल त्यांनी ही शंका उपस्थित केली. सध्याचे पथदीप काढून त्या ठिकाणी १०० कोटी रुपये खर्चून एलईडी पथदीप बसविण्याची काय गरज, ०.३३ एफएसआय मंजूर नसताना ५५ मीटरची क्रेन कशासाठी, त्यासाठी ३० कोटींचा खर्च जनतेच्या पैशातून का, असे प्रश्न उपस्थित करत कोशिरे यांनी पलिकेत मनसेची सत्ता आल्यापासून अनागोंदी सुरू झाल्याचा आरोप केला.
अर्थपूर्ण व्यवहार करत अनेक चुकीच्या अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. याचा जाब लवकरच पक्षातर्फे संबंधितांना विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. नाना महाले यांनी विधानसभा, लोकसभा निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना दक्ष राहण्याचे आवाहन केले. या वेळी महिला अध्यक्ष सुनीता निमसे, उपाध्यक्ष संजय खैरनार, दत्ता पाटील, शंकरराव पिंगळे, आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा