चित्रपटसृष्टीत करवीरनगरीचे नाव उजळविणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीच्या ‘तुतारी’ या बोधचिन्हाचे शुक्रवारी समारंभपूर्वक अनावरण करण्यात आले. ख्यातनाम अभिनेत्री बेबी शंकुतलादेवी नाडगौडा, महापौर प्रतिभा नाईकनवरे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे,कार्यवाह सुभाष भुरके यांच्यासह संचालक उपस्थित होते.     
प्रभात फिल्म कंपनीची स्थापन १ जून १९२९ कोल्हापुरात झाली होती. त्याचे स्मरण म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने प्रभातच्या तुतारी शिल्पाची उभारणी केली होती. उद्घाटनप्रसंगी प्रसाद सुर्वे म्हणाले, ही तुतारी मराठी चित्रपटातील ऐतिहासिक स्थळ आहे. नव्या जमान्यातील पिढीला यापासून बोध घ्यावा म्हणून तुतारीची स्थापना केली आहे. अभिनेत्री अलका कुबल यांनी तुतारी पुतळय़ाचे अनावरण ही अभिमानाची गोष्ट असल्याचे नमूद केले. विजय पाटकर म्हणाले, चित्रपटाचे प्रेरणादायी शिल्प म्हणून याकडे पाहिले जाते. यशवंत भालकर म्हणाले, चित्रपटाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभात चित्रपट कंपनीची अनेक वैशिष्टय़े आहेत. या कंपनीचे शिल्प भावी पिढीला मार्गदर्शन करणारे आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा