सिमेंट, वाळू, दगड हे निसर्गनिर्मित आहेत, तर प्लास्टिक हे मानवनिर्मित आहे. बांधकाम क्षेत्रात दारे, खिडक्या, पाईप, रंग, ड्रेनेज सिस्टिम, इलेक्ट्रिक वस्तू, बाथरूमधील साहित्य हे प्लास्टिकचे वापरले जात आहे. प्लास्टिक अधिक टिकाऊ, स्वस्त, मजबूत, गंजविरोधी असल्याने नैसर्गिक साधनांपेक्षा त्याचा वापर अधिक होऊ लागला असल्याचे प्रतिपादन सिंटॅक्स उद्योगाचे जनरल मॅनेजर प्रशांत त्रिवेदी यांनी सांगितले. ते क्रिडाईच्या ‘दालन २०१३’मधील परिसंवादामध्ये बोलत होते.
कार्यक्रमाला महापालिकेचे उपायुक्त संजय हेरवाडे, क्रिडाई अध्यक्ष राजीव परीख, सेक्रेटरी उत्तम फराकटे, दालनचे अध्यक्ष सुजय होसमनी, महेश यादव, पत्रकार श्रीराम पवार उपस्थित होते. या वेळी रेन वॉटर हार्वेस्टिंगवरही परिसंवाद झाला.
‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’या विषयावरील परिसंवादात बोलताना वॉटर फ़िड टेक्निकल प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक संदीप अध्यापक म्हणाले,‘‘ कोल्हापूर जिल्हा पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. इथे सर्वत्र हिरवीगार वनराई आहे. भविष्यात येणारी पाण्याची समस्या ओळखून आजपासूनच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’करण्याची गरज आहे.पावसाचे पाणी वाचवून त्याची साठवणूक झाली पाहिजे.’’
गेल्या दोन दिवसांपासून दालनला हजारो लोकांनी भेट दिली असून काहींनी फ्लॅटचे बुकिंगही केले. बांधकामासाठी लागणाऱ्या अनेक अवजारांची विक्रीही झाली आहे.
टिकाऊ, स्वस्त, मजबूत, गंजविरोधी असल्याने प्लास्टिकचा अधिक वापर’
सिमेंट, वाळू, दगड हे निसर्गनिर्मित आहेत, तर प्लास्टिक हे मानवनिर्मित आहे. बांधकाम क्षेत्रात दारे, खिडक्या, पाईप, रंग, ड्रेनेज सिस्टिम, इलेक्ट्रिक वस्तू, बाथरूमधील साहित्य हे प्लास्टिकचे वापरले जात आहे. प्लास्टिक अधिक टिकाऊ, स्वस्त, मजबूत, गंजविरोधी असल्याने नैसर्गिक साधनांपेक्षा त्याचा वापर अधिक होऊ लागला असल्याचे प्रतिपादन सिंटॅक्स उद्योगाचे जनरल मॅनेजर प्रशांत त्रिवेदी यांनी सांगितले.
आणखी वाचा
First published on: 21-01-2013 at 07:31 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use of plastic is heavy as plastic is strongrustproof and cheap