पोलीस कर्तव्य मेळाव्यात दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धामध्ये औरंगाबाद विभागात यंदाही उस्मानाबाद पोलिसांनी आपला दबदबा कायम ठेवला. सलग पाचव्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपदावर उस्मानाबाद पोलिसांनी आपले नाव कोरले.
औरंगाबाद परिक्षेत्रातील औरंगाबाद ग्रामीण, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्हय़ातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी यंदा येथे विविध स्पर्धाचे आयोजन केले होते. पोलीस कर्तव्य मेळाव्यात आयोजित केलेल्या या स्पर्धेत उस्मानाबाद संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. एक चषक व १३ अन्य पदकांवरही आपला बहुमान कोरला. सायन्टिफिक एड्स टू इन्व्हेस्टिगेशन, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडिओग्राफी, अँटी सॅबोटेज चेकिंग, कॉम्प्युटर अवेअरनेस व डॉग स्कॉड या कलाप्रकारांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.    

Story img Loader