गेली तीन वर्षे रिक्त असणाऱ्या सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी शासनाने १९९४ बॅचच्या सनदी अधिकारी व्ही. राधा यांची नियुक्ती केल्याचे समजते.
या पदावरील तानाजी सत्रे यांनी मागील तीन वर्षे सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार सांभाळला होता. सहव्यवस्थापकीयपदी असणाऱ्या सनदी अधिकाऱ्याने व्यवस्थापकीयपदाचा तीन वर्षे पदभार सांभाळणारे सत्रे हे सिडकोतील पहिले अधिकारी होते. भाटिया आल्यानंतरही त्यांनी काही काळ आपला जुना पदभार सांभाळला.
महाराष्ट्र सेवेसाठी आलेल्या राधा मागील वर्षभर काही घरगुती कारणास्तव आंध्र प्रदेशात युवक कल्याण आणि पर्यटन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होत्या. त्यांची शासनाने आज सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली आहे.
यापूर्वी त्यांनी मुंबई पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार सांभाळला असून जकातीमध्ये केलेल्या सुधारणा वाखणण्याजोग्या होत्या.