माजी राज्यमंत्री व चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांची मध्यप्रदेश राज्याचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली, राजुरा, ब्रम्हपुरी, भंडारा आदी ठिकाणी विजय वडेट्टीवार यांनी प्रचार कार्याचा झंझावात ठेवून कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणले आहे. कॉंग्रेस समितीचे महासचिव राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशातील दहा लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मोहीम राबवित आहे. त्यासाठी आमदार वडेट्टीवार यांची वर्णी लावण्यात आली आहे. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्य़ात १८ स्वायत्त संस्था, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, जिल्हा परिषद, इत्यादी ठिकाणी आमदार वडेट्टीवार यांनी पक्ष मजबुतीकरिता कार्य केले आहे. १ ते ५ डिसेंबरपर्यंत आमदार वडेट्टीवार मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर, गुना, इंदूर, मोरिना यासह अन्य दहा लोकसभा मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून दिल्ली येथे ७ डिसेंबरला अहवाल सादर करणार आहेत.    

Story img Loader