येथील ज. न. अभ्यंकर स्मृतिनिधी तर्फे दिला जाणारा ‘वैद्यक भूषण’पुरस्कार वाई ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. आनंद भोसले यांना जाहीर झाला आहे. या परिसरात वैद्यक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे १७ वे वर्ष आहे. पाच हजार रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आय.एम.ए., निमा वाई शाखा व निधीच्या विश्वस्तांमार्फत पुरस्कारार्थीची निवड केली जाते. गेली ३० वर्ष सार्वजनिक आरोग्य सेवेत मनापासून योगदान देत असलेल्या डॉ. आनंद भोसले यांनी कुटुंब नियोजन, गर्भ लिंग निदान, स्त्री भ्रूणहत्या रोखणे, पोलिओ प्रतिबंधक मोहीम अशा अनेक क्षेत्रात झोकून देऊन काम केले. १५ फेब्रुवारीला निवृत्त उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे व महाराष्ट्र आरोग्य पत्रिकेचे संपादक डॉ. विलास देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याचे निधीचे विश्वस्त डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी सांगितले.
‘वैद्यकभूषण पुरस्कार’ डॉ. भोसले यांना जाहीर
येथील ज. न. अभ्यंकर स्मृतिनिधी तर्फे दिला जाणारा ‘वैद्यक भूषण’पुरस्कार वाई ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. आनंद भोसले यांना जाहीर झाला आहे. या परिसरात वैद्यक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे १७ वे वर्ष आहे. पाच हजार रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
First published on: 01-02-2013 at 07:34 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaidyak bhushan award to dr bhosale