तरुणाईचा प्रेमाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १४ फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाइन डेचे तरुणांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वानाच वेध लागले आहेत. नवी मुंबईत महाविद्यालयासह प्रत्येक कट्टय़ावर याच चर्चा ऐकण्यास मिळत आहे. तरुणाई सध्या डेमय झाली असून फक्त तरुणाईपुरतेच मर्यादित न राहिलेले व्हॅलेंटाईन डेचे स्वरूप आता बदलत चालले आहे. या डेजमुळे प्रेमाची व्याख्या बदलल्याने तरुणाईच नाही तर प्रत्येक नात्यातील प्रेम या निमित्ताने व्यक्त केले जाऊ लागले आहे. मग ते प्रेयसीचे असो व एका मुलाला आपल्या आईबद्दल वाटणारे प्रेम असो, प्रत्येक वयातील आणि नात्यातील प्रेम या डेद्वारे व्यक्त केले जात असून त्याची सुरुवातही झाली आहे.
ऑनलाइन शॉपिंगमधून गिफ्ट्सचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले जात आहे.नवनवीन संकल्पनेतून साकारलेल्या विविध गिफ्ट्स खरेदी करण्यात वाचणारा वेळ आणि वेगवेगळ्या ऑफर्समुळे ऑनलाइन शॉपिंगच्या पर्यायाला तरुणवर्गाची अधिक पसंती मिळत आहे. ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून गिफ्ट्स मध्ये वेगवेगळ्या व्हारायटी उपलब्ध आहेत. विविध गिफ्ट्सच्या किमतींमध्ये ५० ते ६० टक्क्यापर्यंत सूट देण्यात आली असून वेगवेगळे सुगंधी पफ्र्युम्स, डिझायानर आणि बॅ्रन्डचे ड्रेस, बॅग, लॉकेट आदी वस्तू उपलब्ध आहेत.

चायनामेड भेटवस्तूची चलती
इलेक्ट्रॉनिक वस्तू, खेळणी, मोबाइल अशा अनेकविध उत्पादनांमध्ये चायनामेड वस्तूंनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले असून भेटवस्तूंमध्ये वरचष्मा आहे. प्रेमीयुगुलांच्या दिमतीला हजर करण्यासाठी मार्केटिंगला उधाण येत असून मार्केटिंगचा वरचष्मा आहे.
चेन, प्रेमाचा संदेश लिहिलेले मग आणि फोटोफ्रेम, रॉमँटिक टेडी, डान्सिंग कपल्स, झोपाळ्यावर निवांत बसून गप्पा मारणारे प्रेमीयुगुल अशा अनेकविध भेटवस्तू यातील बहुतांश आकर्षक वस्तू चायनामेड असून सामान्य प्रेमीच्या खिशाला परवडणाऱ्या असल्यामुळे या भेटवस्तूंना ग्राहकांकडून मागणी होत आहे, असे विक्रेते बाबुलाल आग्रवाल यांनी सांगितले.

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षांव
रोझ डे, चॉकलेट डे, टेडी डे तसेच आदि डे साजरे करत असताना ग्रीटिंग कार्डचा वापर तरुणाई नाकारत सोशल मीडियावरील व्हॉटसअप, फेसबुक, ट्विटरचा, एसएमएस आदी ऑप्शन स्वीकारले आहेत. वर्षभरात प्रियजनांसोबत साजरे केलेले काही खास क्षण व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले जात आहेत. मित्र-मैत्रिणींनी दिलेल्या गिफ्टसोबत सेल्फी काढून स्वत:च्या आवडीचे किवा गायलेले गाणे त्या प्रियजनांना ऐकविले जात असून डेजनुसार प्रत्येक जण दररोज स्टेटस चेंज करीत असून डीपी आणि आयकॉनही बदलत आहे. ई-मेलच्या माध्यमातून देखील शुभेच्छांचा वर्षांव केला जात आहे.

Story img Loader