तरुणाईचा प्रेमाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १४ फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाइन डेचे तरुणांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वानाच वेध लागले आहेत. नवी मुंबईत महाविद्यालयासह प्रत्येक कट्टय़ावर याच चर्चा ऐकण्यास मिळत आहे. तरुणाई सध्या डेमय झाली असून फक्त तरुणाईपुरतेच मर्यादित न राहिलेले व्हॅलेंटाईन डेचे स्वरूप आता बदलत चालले आहे. या डेजमुळे प्रेमाची व्याख्या बदलल्याने तरुणाईच नाही तर प्रत्येक नात्यातील प्रेम या निमित्ताने व्यक्त केले जाऊ लागले आहे. मग ते प्रेयसीचे असो व एका मुलाला आपल्या आईबद्दल वाटणारे प्रेम असो, प्रत्येक वयातील आणि नात्यातील प्रेम या डेद्वारे व्यक्त केले जात असून त्याची सुरुवातही झाली आहे.
ऑनलाइन शॉपिंगमधून गिफ्ट्सचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले जात आहे.नवनवीन संकल्पनेतून साकारलेल्या विविध गिफ्ट्स खरेदी करण्यात वाचणारा वेळ आणि वेगवेगळ्या ऑफर्समुळे ऑनलाइन शॉपिंगच्या पर्यायाला तरुणवर्गाची अधिक पसंती मिळत आहे. ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून गिफ्ट्स मध्ये वेगवेगळ्या व्हारायटी उपलब्ध आहेत. विविध गिफ्ट्सच्या किमतींमध्ये ५० ते ६० टक्क्यापर्यंत सूट देण्यात आली असून वेगवेगळे सुगंधी पफ्र्युम्स, डिझायानर आणि बॅ्रन्डचे ड्रेस, बॅग, लॉकेट आदी वस्तू उपलब्ध आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा