देशाप्रती प्रेमभावना व्यक्त करून आर्ट ऑफ लिव्हींगच्या युवकांनी व्हॅलेंटाईन डे साजरा केला. यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांनी आजच्या दिवशी रक्तदान केले. न्यु आर्टस महाविद्यालयातील युवकांनी आर्ट ऑफ लिव्हींग अंतर्गत व्हॅलेंटीअर फॉर बेटर नगर हा ग्रुप स्थापन केला आहे. संस्थेचे युथ समन्वयक पवन गांधी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. अभिजित वाघमारे,गौरव हेमाडे, चैतन्य कुलकर्णी, ओंकार परदेशी, जयदीप पाटील, सारंग मुळे, मयुर तोडमल, अक्षय कराळे, अदिती खंडेलवाल, मनिषा पाटील, रोहिणी आबूसकर आदींनी हुतात्मा स्मारक येथे जाऊन पुष्पचक्र अर्पण केले. देशाच्या प्रगतीसाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली.
यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थी दरवर्षी यादिवशी रक्तदान करतात.या उपक्रमाचे हे सलग १२ वे वर्ष होते. विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही यात सहभागी झाले. एकूण ७८ पिशव्या रक्तसंकलन झाले. डॉ. विलास मढीकर, डॉ. श्रीमती जोशी, डॉ. गुप्ता, प्रशासकीय अधिकारी साठे, प्रा. महेश रच्चा, प्रा. मंगूडकर, प्रा. गुणनवरे, समन्वयक सुधाकर कोकाटे, मधुकर साळवे, विठ्ठल जरे यांनी संयोजन केले.
सामाजिक उपक्रमांनी व्हॅलेंटाईन डे साजरा
देशाप्रती प्रेमभावना व्यक्त करून आर्ट ऑफ लिव्हींगच्या युवकांनी व्हॅलेंटाईन डे साजरा केला. यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांनी आजच्या दिवशी रक्तदान केले. न्यु आर्टस महाविद्यालयातील युवकांनी आर्ट ऑफ लिव्हींग अंतर्गत व्हॅलेंटीअर फॉर बेटर नगर हा ग्रुप स्थापन केला आहे. संस्थेचे युथ समन्वयक पवन गांधी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. अभिजित
First published on: 15-02-2013 at 04:13 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentine day is celebrated by social campaign