शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत पर्यावरणाविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी, तसेच वनसंवर्धनातून नावीन्यपूर्ण माहिती मिळावी, या हेतूने गेल्या १७ वर्षांपासून घेतल्या जात असलेल्या वनश्री महोत्सवाची यंदाही मोठय़ा उत्साहात तयारी सुरू आहे. येत्या २५ ते ३० डिसेंबर दरम्यान लातूरकरांना या महोत्सवाची पर्वणी साधता येईल.
सुंदर लातूर, हरित लातूर ही घोषणा प्रत्यक्षात उतरावी, यासाठी प्रयत्न करणारी वृक्षप्रेमी मंडळी लातुरात सक्रिय आहेत. १७ वर्षांपूर्वी वनश्री महोत्सवाची कल्पना समोर आली. त्यावेळी लातुरात घरगुती, शासकीय, निमशासकीय अशा सर्व बागांची संख्या केवळ अडीचशेच्या आसपास होती. यंदा ही संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. गेल्या १७ वर्षांत शहराचा विकास झपाटय़ाने झाला. मात्र, यात वृक्ष-वनराईचे स्थान असले पाहिजे, याची जाणीव लोकांत निर्माण करण्याचे श्रेय वनश्री मित्रमंडळाकडे जाते.
शहरात बागांचे संगोपन शास्त्रीय पद्धतीने व्हावे, यासाठी हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये २०० माळय़ांना आठ दिवस बागकाम प्रशिक्षण दिले गेले. हे प्रशिक्षित माळी अतिशय माफक दरात घरगुती बागेची देखभाल करतात. महोत्सवादरम्यान शाळकरी मुलांमध्ये वृक्षांविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते. सेंद्रिय खते व बागकाम साहित्याचे स्टॉल्स, सेंद्रिय शेती उत्पादनांचे स्टॉल्स, गोवा येथील गोवा पॉटरीजचा स्टॉल, वनौषधीचे प्रदर्शन व स्टॉल्स, वाचनीय व संग्रहणीय कृषी पुस्तकांचे प्रदर्शन या महोत्सवात असते.
यंदा १० ते १५ फूट उंचीची झाडे महोत्सवात उपलब्ध केली जाणार आहेत. ट्रीगार्डशिवाय ही झाडे लावता येतात. याची किंमत फक्त ६०० रुपये आहे. या पशात वनश्री मित्रमंडळ झाड लावून देण्याची जबाबदार घेणार आहे. यंदाच्या प्रदर्शनात दुर्मिळ फुलांचे प्रदर्शन राहणार आहे. औरंगाबादचे वृक्षप्रेमी एस. दास यांच्या संग्रहातील डािन्सग प्लांट हे महोत्सवाचे आकर्षण असेल. संगीताच्या तालावर हे झाड डुलते व संगीत बंद झाल्यावर त्याचे डुलणे थांबते. त्यांच्या संग्रहातील किडे खाणारे झाडही नागरिकांनाही पाहता येतील. जर्मनी, इस्राएल, अमेरिका येथे जाऊन स्वत त्या झाडांची माहिती घेऊन दास यांनी त्यांची बाग विकसित केली. त्यांच्याशी नागरिकांना संवाद साधता येणार आहे. लातूरचे वास्तुशास्त्रज्ञ कृष्णकुमार बांगड यांच्या पुढाकाराने पर्यावरण अनुकूल घर कसे असावे? याचे मॉडेलच या प्रदर्शनात उपलब्ध राहणार आहे.
पर्यावरण अनुकूल घर बांधले तर त्यामुळे घराच्या आतील तापमान बाहेरच्या वातावरणापेक्षा कमी राहते, याचे प्रात्यक्षिकही पाहता येणार आहे. वनश्री महोत्सवानिमित्त चित्रकला, निबंध, वक्तृत्व आदी स्पर्धाही होणार आहेत. मकरसंक्रांतीनिमित्त महिलांनी वृक्षवाण योजना राबवावी, यासाठी महिला मंडळांना आवाहन करण्यात येणार आहे. वनश्री मित्रमंडळाच्या पुढाकाराने यापूर्वी वृक्षप्रेमींच्या सहली आयोजित केल्या होत्या. बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी वनश्री संस्कार कार्यक्रमाचे आयोजनही महोत्सवादरम्यान केले जाणार आहे. वनश्री महोत्सव वनश्री मित्रमंडळाच्या पुढाकाराने भरवला जात असला, तरी तो समस्त लातूरकरांचा व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन व त्याचे प्रात्यक्षिक जयसिंगपूरचे गिरीष जाधव सादर करणार आहेत. या पाच दिवसीय महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आमदार दिलीपराव देशमुख हे असून महोत्सव यशस्वीतेसाठी वनश्री मित्रमंडळाचे अध्यक्ष ईश्वर बाहेती, सचिव व्यंकटेश हािलगे, कार्याध्यक्ष संध्या िशदे, समन्वयक अर्जुन कामदार आदी परिश्रम घेत आहेत.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Shivsena Eknath Shinde Rebel Winner Candidates List in Marathi
Shivsena Eknath Shinde Rebel Candidates Result : एकनाथ…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
shani rash parivartan 2025 shani guru transit change luck of these zodiac
Shani Rashi Parivartan 2025: नववर्षात शनि-गुरु बदलणार चाल, ‘या’ राशीच्या लोकांच्या नशिबाचे दार उघडणार, नोकरीसह मिळणार पैसाच पैसा
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
farmers anger continues in 70 constituencies over soybean msp
७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…