अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या मुंबई शाखेतर्फे २०१३च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन अलीकडेच दादर येथील ब्राह्मण साहाय्यक संघ सभागृहात झाले. या वेळी कल्याण आश्रमाच्या तीन वयोवृद्ध कार्यकर्त्यांचा हृद्य सत्कारही करण्यात आला.
दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी उपमहापौर मोहन मिठबावकर प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रमुख वक्ते म्हणून कल्याण आश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंदू जोशी उपस्थित होते. या वेळी श्रीमती रजनीताई जोशी, पद्माताई आंबेकर व गजाननराव केळकर या कार्यकर्त्यांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. हे तिघेही कार्यकर्ते मुंबई शाखेच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई शाखेचे सचिव आप्पा कोचरेकर यांनी केले.
आणखी वाचा