उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २२ वा वर्धापनदिन तसेच शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट प्राचार्य, शिक्षक, महाविद्यालय तसेच अधिकाऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. पाच वर्षांपासून बंद असलेल्या या पुरस्कारांची प्रथा कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांनी या वर्षांपासून पुन्हा सुरू केली.
विद्यापीठाचा २२ वा वर्धापनदिन सोहळा विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली झाला. पोलीस अधीक्षक एस. जयकुमार हे मुख्य पाहुणे म्हणून तर विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीपाद जोशी हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाने उत्कृष्ट महाविद्यालय तर भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयाच्या डॉ. मीनाक्षी वायकोळी यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार देण्यात आले. धुळ्याचे झेड. बी. पाटील महाविद्यालयातील प्रा. दोधा अहिरे यांना उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक तर विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागाचे प्रा. सतीश कोल्हे यांना विद्यापीठीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात आले. विद्यापीठ अभियंता श्रीराम पाटील, कक्षाधिकारी विकास तळेले यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार मिळाला. महेंद्र बडगुजर, शालिका तिरमले, अशोक सरदारसिंग पाटील, विष्णू पाटील, उषाबाई खाडे, विलास बाविस्कर आणि मनोज पावरा यांना विविध गटांतून उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा