सॉप्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने आयोजित ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत नाशिक केंद्रावर प्राथमिक फेरीच्या पहिल्या दिवशी वैविध्यपूर्ण विषयांवर एकांकिकांचे सादरीकरण झाले. या एकांकिकांच्या कथांवर टाकण्यात आलेला हा प्रकाशझोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘चार भिंती, एक छप्पर’
घर म्हणजे केवळ चार भिंती नाहीत. खरेतर नाती घट्ट करून चार भिंती उभारायच्या असतात. सहविचाराने जगण्यातील आनंद वेगळ्या धाटणीत दर्शविणारी ही कथा. सासु-सून यांच्यातील मनभेदावर प्रकाश टाकताना मायेचा ओलावाही दर्शविते. ज्यांनी लहानाचे मोठे केले, ज्यांनी जगण्याची रीत शिकविली, त्या वयोवृध्द आई-वडिलांचा सांभाळ करण्यास सध्याची पिढी तयार होत नाही. त्यांच्याकडे असणारी मालमत्ता, दाग-दागिने त्यांना हवे असतात. परंतु, त्यांचा सांभाळ मात्र करावयाचा नसतो. सून व तिची महाविद्यालयाचे वारे लागलेली मुलगी वडिलांच्या मदतीने आजीला कस्पटासमान वागणूक देतात. सासूच्या दागिन्यांवर सुनेची नजर असते. किमान त्यासाठी तरी कुटुंबिय आपल्याला शेवटपर्यंत सांभाळतील ही सासुबाईंची आशा. पण ती देखील फोल ठरते. ही मंडळी आजीला वृध्दाक्षमात पाठविण्याची तयारी करते. तत्पुर्वी दागिने काढून घेण्याचेही त्यांचे नियोजन असते. ही बाब लक्षात आल्यावर लहानपणापासून सांभाळ केलेली घरातील अविभाज्य भाग असणारी व्यक्ती (मोलकरीण) महत्वाची भूमिका बजावते. आजीबाईंशी तिचा विशेष जिव्हाळा. यामुळे त्यांना वृध्दांक्षमात पाठविण्याचे टाळून आपल्या घरी घेऊन जातात. कुटुंबियांनी घेतलेला निर्णय तिला पटत नाही आणि शाहीराच्या मदतीने ती सर्वाना वास्तवाचे भान करून देते. अखेरीस कुटुंबियांना आपल्या चुकीची जाणीव होते. मग, आजीबाईला पुन्हा घरी आनंदाने बोलाविले जाते.
पाठवण
आज सर्व क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. बाह्य जगात हे चित्र असले तरी कौटुंबिक जीवनात दोन-तीन पिढय़ांमधील विचारात अंतर पडल्यावर महिलेकडे पाहण्याच्या दृष्टिकोन कसा बदलतो हे वेगळ्या धाटणीने दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आधुनिक जगात वावरणाऱ्या नातीला संस्काराची शिदोरी देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आजीच्या मनात वंशाच्या दिव्याबाबत आयुष्यभर रुखरुख राहिली. त्याचे प्रत्यंतर नेहमी तिच्या वागण्या-बोलण्यातून येते. नातीकडे पाहण्याचा आजीचा दृष्टीकोन सुनेला अर्थात तिच्या आईला यातनादायी ठरत असतो. दोन्ही पिढय़ांमध्ये आईची होणारी कुचंबणा दाखविली गेली आहे. जुने आचारविचार, चालीरिती, परंपरा पाळायचे राहिले तर मुलगी जगाच्या मागे पडेल ही भीती आणि नव्या नव्या गोष्टी स्वीकाराव्यात तर आपली संस्कृती लयास जाईल, पुढील पिढीला संस्कारांची शिदोरी दिली जाणार नाही ही भीती वाटते. जुन सोडवत नाही आणि नवीन घेववत नाही या मानसिकद्वंदात अडकलेली पिढी हा मुलगा-मुलगी भेद-भाव मिटविण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी सामथ्र्यशाली महिलांची सासुबाईंना ओळख करून देते. अखेरीस आजीलाही सुन व नातीचे महत्व लक्षात येते.
बाबा तडतडी
गावोगावी दुकान थाटून बसलेल्या भोंदुबाबाचे अंतरंग उलगडून दाखविणारी ही कथा. आपला भक्त परिवार वाढविण्यासाठी हे बाबा कोणता मार्ग अनुसरतात यावर बोट ठेवण्यात आले आहे. दैनंदिन जीवनातील अडचणी, आजारपण यातून मार्ग काढण्यासाठी अनेक जण डॉक्टरकडे जाण्याऐवजी भोंदुबाबाच्या आश्रमात जातात. मग, हे बाबा काही चमत्कार दाखवून भक्तांची लूट करण्यास सुरुवात करतात. खोकल्याने त्रस्त झालेल्या मुलीला अशाच एका भोंदुबाबाबाकडे घेऊन गेलेल्या आईची कशी फसवणूक होते हे दर्शविण्यात आले आहे. भोंदुबाबाच्या चमत्काराने मुलीच्या प्रकृतीत काही फरक पडत नाही. अखेरीस डॉक्टरांकडे नेऊन उपचार सुरू होतात आणि प्रकृती सुधारू लागते. मग संपूर्ण कुटुंब ग्रामस्थांच्या सहकार्याने भोंदुबाबाचा पर्दाफाश करते. अंधश्रध्देवर प्रकार करताना टीबी आजाराबाबत संदेश देत त्याची लक्षणे, इतरांना त्याची लागण होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
कॉलेज कट्टा
कॉलेज कट्टा म्हटला की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर वेगळेच चित्र उभे राहते. शहरी व ग्रामीण भागातील कॉलेज कट्टय़ामध्ये भलताच फरक असतो. शहरी भागातील कट्टे मित्र-मैत्रिणींच्या गर्दीने फुललेले. पण, ग्रामीण भागात असा संयुक्त कट्टा औषधालाही सापडत नाही. महाविद्यालयीन युवकांच्या बोलीभाषेत कमालीचा फरक असतो. ग्रामीण भागातील कट्टय़ावर राजकारण हाच सर्वात रंगतदार विषय. त्याची छाया तरुणांच्या बोलण्यावरही पडलेली असते. गावगुंडीचे राजकारण कसे असते याबाबत आपण बरेच ऐकलेले असते. वाचलेले असते. पण, ग्रामीण भागातील कॉलेज कट्टे या विषयाला अपवाद ठरत नाही. गावात पुढारीपण करण्याची प्रत्येकाला आस असते. त्यातून मग एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात सर्वसामान्य भरडले जातात. कॉपीचे दुष्परिणाम, मतदानाचा हक्क, शिक्षणाचे महत्व, नोकरी, युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधिनता, शेतमालास मिळणारा भाव, आमदार व सरपंच यांच्यातील असुया आदी मुद्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
टाईमपास
वडील व मुलांमधील वादाची स्वतंत्र व्यवसायात झालेली परिणती आणि तो व्यवसाय आहे लग्न जमवून देण्याचा. लग्न जमविण्यासाठी, एखाद्या मुलीला साकडे घालण्यासाठी युवकांकडून कोणकोणते मार्ग अनुसरले जातात यावर कथेत प्रकाश टाकण्यात आला आहे. विवाह जुळविणाऱ्या अनेक संस्था कोणकोणत्या प्रकारे नागरिकांना लुबाडत असतात हे दाखवितानाच सद्यस्थितीत आंतरजातीय विवाहांची कशी गरज आहे हे अधोरेखीत करण्यात आले आहे.
‘इटर्नल ट्रुथ’
सध्याच्या काळात नातेसंबंधांऐवजी पैसा किती प्रिय आहे याचे भेदक वास्तव उलगडून दाखविणारी ही कथा. गर्भश्रीमंत, प्रतिष्ठित घरातही कर्ता पुरुष गेल्यानंतरही कुटुंबियांची नेमकी कशासाठी लगबग सुरू असते हे दर्शविण्यात आले आहे. नामांकीत उद्योजकाच्या कुटुंबावर रेखाटलेली ही कथा आहे. प्रतिष्ठा व पैसा हाती येऊनही ती व्यक्ती जवळच्या माणसासाठी तगमगत राहते. सर्व काही पदराशी लोळण घेत असताना माणूस आपल्या माणसाला भुकेला असतो. आपला वाटणारा माणूस खरोखरच आपल्याशी ऋणानुबंध जोडून असतो का, त्याला नेमके काय महत्वाचे असते याचे त्रिकालबाधीत सत्य उलगडले जाते. कोणाचे कोणावाचुन अडत नाही. जगतांना माणूस नात्याचा गुंता वाढवितो. या गुंत्यात स्वार्थी, आपल्यावर मनापासून प्रेम करणारी काही तटस्थ राहणारी मंडळी सहज सामावली जातात आणि आपण मात्र हे सारे आपले म्हणत मिरवत राहतो. माणसे आणि त्यांचे प्रेम यावर नितांत श्रध्दा असलेला, त्याची बायको व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवत प्रत्येक घटनेला आपल्या चष्म्यातुन तोलणारी. या उद्योजकाने आयुष्यात खुप पैसा, कीर्ती मिळवली. आपल्या बोलघेवडय़ा स्वभावाने माणसेही जोडली. पण वेळोवेळी जोडलेल्या माणसाच्या नात्यातील आपलेपणाचे आवरण दुर झाले आणि समोर आले कटु वास्तव. त्याच्या मृत्यूचा बायको, त्याचा सचिव, त्याचा मुलगा कसा फायदा करून घेतात यावर एकांकिकेत भाष्य करण्यात आले आहे.