२०१२ या फलोत्पादन वर्षांनिमित्त निफाड तालुक्यातील चितेगाव येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या वतीने फलोत्पादन, भाजीपाला तसेच पिकांविषयी समाजात जागृती व्हावी म्हणून आयोजित विविध स्पर्धामध्ये सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
वादविवाद, रांगोळी, सॅलाड मांडणी, निबंध अशा स्पर्धा यानिमित्ताने घेण्यात आल्या होत्या. वादविवाद स्पर्धेत ब गटात चितेगाव नूतन विद्यालयाची श्रद्धा शेटे, नाशिकच्या न्यू ईरा स्कूलची आकांक्षा खांडेकर आणि क गटात नाशिक येथील अशोका संस्थेच्या बी.एड. अभ्यासक्रमाची वर्षां बोरसे व रजनी शर्मा प्रथम आले.
वक्तृत्व स्पर्धेत ब गटात नाशिकच्या न्यू ईरा स्कूलचा यशराज चव्हाण, क गटात के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील केदू जाधव, रांगोळी स्पर्धेत अ गटात न्यू ईरा स्कूलचे मानसी सोनवणे व चैताली सोनवणे, ब गटात चितेगाव नूतन विद्यालयाचे कांचन शेलार व श्रद्धा शेटे, क गटात अशोकाच्या बी.एड. महाविद्यालयातील सीमा शिंदे व कांचन सोनवणे, सॅलाड मांडणी स्पर्धेत अ गटात पोद्दार स्कूलच्या सलोनी डांगरे व शव्वाना पठाण, ब गटात चितेगाव नूतन विद्यालयाची कल्पना दाभाडे, क गटात अशोकाच्या बी.एड. महाविद्यालयातील ऋतुजा पाटोळे व निखात खातिब, निबंध स्पर्धेत अ गटात चितेगाव नूतन विद्यालयाचा अक्षय शिरसाठ, ब गटात न्यू ईरा स्कूलचा प्रांशू टोपले, क गटात अशोकाच्या बी.एड. महाविद्यालयातील अभिषेक घनावट हे प्रथम आले.
‘एनएचआरडीएफ’च्या विविध स्पर्धाचा निकाल
२०१२ या फलोत्पादन वर्षांनिमित्त निफाड तालुक्यातील चितेगाव येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या वतीने फलोत्पादन, भाजीपाला तसेच पिकांविषयी समाजात जागृती व्हावी म्हणून आयोजित विविध स्पर्धामध्ये सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 16-03-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various compitition result of nhrdf