चंद्रपूर पंचशताब्दी महोत्सव समिती व चंद्रपूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील चांदा क्लब ग्राँऊड येथे सुरू असलेल्या पंचशताब्दी महोत्सवात नुकतेच जिल्हय़ातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ माध्यमिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता गीत गायन व समूह नृत्य व विविध सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
विधानसेभेचे उपाध्यक्ष प्रा. वंसत पुरके यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तर अध्यक्षस्थानी माजी खासदार नरेश पुगलिया होते. यावेळी गजाननराव गावंडे, महराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव राहुल पुगलिया, महापौर संगीता अमृतकर, उपमहापौर संदीप आवारी, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, मनपा उपायुक्त रवींद्र देवतळे, राजेश मोहिते, महापालिका अधिकारी कंदेवार, शिक्षण विभागाचे प्रशासक अधिकारी मिरासदार, जिल्हा काँग्रेसचे महासचिव अ‍ॅड अविनाश ठावरी, अशोक नागापूरे, डॉ सुरेश महाकुलकर, युवा नेता कुशल पुगलिया, नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.
या स्पध्रेत एकूण १८ गायक स्पर्धकांनी भाग घेतला. त्यात प्रथम पुरस्कार इंदिरा गार्डन स्कूल, व्दितीय पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, तर तृतीय पुरस्कार विद्याविहार शाळेनी पटकावला. तर नृत्य स्पध्रेत एकूण ३४ शाळा, महाविद्यालयांनी भाग घेतला. यात प्रथम क्रमांक चांदा पब्लिक स्कूल, व्दितीय क्रमांक डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने तर तृतीय क्रमांक सरदार पटेल महाविद्यालयाने पटकावला. या स्पध्रेत मूक-बधिर विद्यार्थ्यांनीही मार्गदर्शिकेच्या सूचक सांकेतिक हालचालीवरून मनोवेधक नृत्य सादर केले. नृत्य स्पधेचे परीक्षण अवंती काळे, प्रतिभा जीवतोडे, कला मॅडम, खुशबु भाताड यांनी तर गायन स्पध्रेचे सोनम कपूर, प्रशांत वालके, सोनाली, अल्वीन प्रिसलीन यांनी केले