वारणा दूध संघाच्या वतीने जातिवंत दुधाळ जनावरांचे प्रदर्शन आयोजित केले होते. सवरेत्कृष्ट ठरलेल्या बबन तुकाराम भंडारी (नरंदे) यांच्या म्हशीस वारणा श्री, तर बबुताई बळवंत यादव (बच्चे सावर्डे) यांच्या गायीस वारणा श्री अशा सवरेत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला. सवरेत्कृष्ट म्हणून गौरविलेल्या जनावरांच्या मालकांना रोख बक्षिसे दिली. या प्रदर्शनात विविध जातींच्या ३००जातिवंत जनावरांचा समावेश होता.
गेल्या १४ वर्षांपासून स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर जातिवंत दुधाळ जनावरांचे भव्य प्रदर्शन भरवले जाते. याचे उद्घाटन वारणा समूहाचे नेते आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झाले. वारणा दूध संघाला पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना त्याचबरोबर आदर्श दूध संस्था म्हणून नवजीवन (तळसंदे), महावीर (किणी), आदर्श महिला (मिणचे), सर्वाधिक गाय दूध पुरवठा हनुमान (पारगाव), सर्वाधिक पशुखाद्य खरेदी हनुमान (पारगाव) यांना बक्षिसे दिली. डॉ. एच. एस. बिराडे, डॉ. नितीन मरकडेय, डॉ. ए. पी. कोळी, डॉ. डी. ए. पवाळकर, डॉ.जी. एम. कादेगावकर उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक उपकार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी तर आभार संचालक महावीर पाटील यांनी मानले.
वारणा दूध संघाच्या वतीने जातिवंत जनावरांचे प्रदर्शन
वारणा दूध संघाच्या वतीने जातिवंत दुधाळ जनावरांचे प्रदर्शन आयोजित केले होते. सवरेत्कृष्ट ठरलेल्या बबन तुकाराम भंडारी (नरंदे) यांच्या म्हशीस वारणा श्री, तर बबुताई बळवंत यादव (बच्चे सावर्डे) यांच्या गायीस वारणा श्री अशा सवरेत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला. सवरेत्कृष्ट म्हणून गौरविलेल्या जनावरांच्या …
First published on: 16-11-2012 at 01:03 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varna milk assocation arrenged the animal exibition