कोल्हापूर जिल्हा पर्यटन राजधानी जाहीर करून २०० कोटींचा निधी तातडीने जिल्ह्य़ाला द्यावा, अशी मागणी मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या नेतृत्वाखालील विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन केली. महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी जिल्ह्य़ाच्या पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील आहे. संघटनांच्या मागणीची दखल घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या शिष्टमंडळात मल्हार सेनेचे बबन रानगे, पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड, शेकापचे बाबुराव कदम, क्षेत्रीय मराठा चेंबर्सचे दिलीप पाटील, डॉ.गिरीश कोरे, उज्वल लिंग्रस, अवधूत पाटील, शाहीर दिलीप सावंत, प्रसाद पाटील आदी उपस्थित होत.