हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा ३४ वा स्मृतिदिन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखली पुसद येथे झाला. या कार्यक्रमात कृषी शास्त्रज्ञ आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा कृषी गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यावेळी उपस्थित होते.
कृषी आणि जलसंपदा विभागाला आकार देणाऱ्या वसंतराव नाईकांचे कार्य महाराष्ट्र कधीच विसरणार आहे, असे उद्गार जलसंपदामंत्र्यांनी यावेळी काढले. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात आयोजित कार्यक्रमात जलसंपदामंत्री बोलत होते. या समारंभाला अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक कापूस पणन महासंघाचे डॉ. एन.पी हिराणी, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगावकर यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते.
 राज्यातील बाळासाहेब मराळे (नशिक), संगीता टिळेकर (पुणे), विष्णू जरे, डॉ. मिलिंद देशमुख (नगर), आनंद पाटील (सांगली), केदार जाधव (जालना), डॉ. किझर बेग (परभणी) या प्रगतिशील शेतकरी आणि कृषी संशोधकाचा जलसंपदामंत्र्यांच्या हस्ते याप्रसंगी वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिनकर गुल्हाने आणि प्राचार्य गणेश पाटील यांनी संपादित केलेल्या ‘ऋतूरंग’ या अंकाचे प्रकाशन भावे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे संचालन माधुरी आसेगांवकर, उत्तम रुद्रवार, छाया कोकाटे यांनी केले. आभार प्रा. गोिवद फुके यांनी मानले.

Story img Loader