ग्राहकांना खरेदीच्या समाधानासोबतच चांगल्या व्यवहाराचा आनंद देणााऱ्या वेडोम्स प्रतिष्ठानाने गौरवशाली परंपरेत आणखी एक पाऊल टाकत पूर्व नागपुरातील नागरिकांसाठी सेवा सुरू केली आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन वेडोम्स मेडिकलजवळ नवे शोरूम सुरू करीत आहे. यामध्ये एलजी, सॅमसंग,  व्हिडिओकॉन, आयएफबी, युरेका फोर्ब्स, सोनी, फिलिप्स या कंपन्यांची उत्पादने उपलब्ध राहतील. एलसीडी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, एसी, वॉटर प्युरीफायर, व्हॅक्युम क्लीनर, सेट टॉप बॉक्स आदी वस्तू विविध रंग आणि दरात उपलब्ध राहतील. १९६२ मध्ये घरगुती उपकरणांच्या विक्रीपासून व्यवसाय सुरू केलेले वेडोम्स आता मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबच्या अनेक कंपन्यांचे विक्रेते आहेत. वेडोम्स आणि बजाज फायनान्सच्या संयुक्त माध्यमातून ग्राहक सर्व प्रकारची उत्पादने शून्य व्याजदराने मासिक हप्त्यांद्वारे खरेदी करू शकतात. ग्राहकांना खरेदीवर आकर्षक भेटवस्तूही दिल्या जात आहेत. ही योजना २० जुलैपर्यंत सुरू राहील. अधिक माहितीसाठी ९८९०५०६२५४ क्रमाकांवर संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा