विदर्भात बहुजन समाज पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खाते उघडता आले नाही. उत्तर नागपुरात बसपला संधी होती. परंतु संधीचे सोने करण्यात माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये कमी पडले.
मनसेला वैदर्भीय जनतेने साफ नाकारले. मनसेच्या उमेदवारांना कुठेही दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांची मते घेता आली नाही. यवतमाळ जिल्ह्य़ातील वणी मतदारसंघात मनसेला आशा होती. परंतु येथील उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. बसपला विदर्भात चार ठिकाणी दुसऱ्या क्रमांची मते मिळाली आहेत. उत्तर नागपूर, भंडारा, यवतमाळ आणि उमरेडमध्ये बसप दुसऱ्या क्रमांकावर आहे.
उत्तर नागपूरचे बसपचे उमेदवार किशोर गजभिये यांना ५५ हजारांहून अधिक मिळाली. त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांना कडवी झुंज दिली. परंतु बौद्ध समाजाच्या मतांचे विभाजनाचा फटका गजभिये यांना बसला.
गजभिये यांचा १३ हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा