परभणीत ८ व ९ फेबुवारीला होणाऱ्या बाराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीराम गुंदेकर यांची निवड करण्यात आली. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रा. प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले यांनी ही माहिती दिली.
डॉ. गुंदेकर हे ग्रामीण व सत्यशोधकी साहित्यप्रवाहांचे प्रवर्तक आहेत. दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्यचळवळ, तसेच युक्रांद-राष्ट्रसेवा दलासारख्या चळवळीत सहभागासह अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतही त्यांचे योगदान आहे. डॉ. गुंदेकर यांच्या उचल, लगाम या कथा, महात्मा फुले विचार व वाङ्मय, ग्रामीण साहित्य प्रेरणा व प्रयोजन हे समीक्षा ग्रंथ आहेत. गेल्या १० वर्षांपासून सत्यशोधकी साहित्याचा विकास हा प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे. त्याचे दोन खंड प्रसिद्ध झाले आहेत.
गुंदेकर यांच्या रूपाने विद्रोही साहित्यसंमेलनास चळवळींचे अधिष्ठान असलेले लेखक अध्यक्ष लाभल्याचे संयोजकांनी सांगितले. सरकारने अखिल भारतीय साहित्य संमेलनास २५ लाखांचा मलिदा देणे थांबवावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शेकापचे राज्य खजिनदार भाई लक्ष्मणराव गोळेगावकर आहेत. सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मदानावर हे संमेलन पार पडणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा