करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यपदी विद्या चिवटे यांची बहुमताने निवड झाली. या नगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे माजी आमदार जयवंत जगताप यांच्या गटाचे अबाधित वर्चस्व आहे.
मावळत्या नगराध्यक्षा पुष्पा फंड यांनी आघाडीअंतर्गत ठरल्यानुसार मुदत संपल्याने पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी तहसीलदरा राजेंद्र पोळ यांच्या अधिपत्याखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सत्ताधारी जगताप गटाने विद्या चिवटे यांना संधी दिली, तर विरोधी राष्ट्रवादीच्या आमदार श्यामल बागल गटाने सुनीता घोलप यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते. यात मतदान होऊन विद्या चिवटे यांना ११ मते पडली तर त्यांच्या प्रतिस्पधी सुनीता घोलप यांच्या पारडय़ात ५ मते पडली. नगराध्यक्षपदी विद्या चिवटे यांची निवड झाल्याचे जाहीर होताच जगताप समर्थकांनी भर पावसात नगरपालिकेच्या आवारात फटाक्यांची प्रचंड आतशबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.