नाटककार विजय तेंडुलकर यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात लिहिलेले आणि अरविंद देशपांडे यांनी १९६८ साली रंगभूमीवर आणलेले ‘झाला अनंत हनुमंत’ हे नाटक नव्याने रंगभूमीवर येत आहे. अनंत अंकुश दिग्दर्शित या नाटकाचा विशेष प्रयोग व्हिजन केअर या संस्थेतर्फे २१ फेब्रुवारी रोजी रवींद्र नाटय़मंदिरमध्ये सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यश गिरवण्याचं नाकारणारा लेखक

तेंडुलकरांच्या विनोदी शैलीचे ओळख करून देणारे हे नाटक असून ‘अनंत हनुमंत कुलकर्णी’ ही प्रमुख व्यक्तिरेखा ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र पेंढारकर यांनी साकारली होती. नव्या रूपात व्यावसायिक रंगभूमीवर येत असलेल्या या नाटकात प्रमुख भूमिका रत्नाकर देशपांडे साकारत असून गीतांजली कांबळी, भाग्यश्री कामत, गिरिजा फडके, योगिता परदेशी, चेतन कुमावत, सचिन सुर्वे, राहुल शेंडे, श्रीकांत हांडे, अवधूत माळी, सतीश बोरये, ओंकार दामले, सुशील वळंजू, विनायक हेरवडे या कलावंतांच्या भूमिका आहेत. नव नाटय़ पर्व या संस्थेतर्फे व्यावसायिक रंगभूमीवर हे नाटक येत असून नाटकातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा उड्डाण करते हा अतिशय महत्त्वाचा भाग यात आहे. १९६८ साली भालचंद्र पेंढारकर यांनी उड्डाण घेण्यासाठी खूप श्रम केले होते. आता आजच्या काळात हे उड्डाण कसे होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. माझ्या पिढीतील तरुणांना तेंडुलकरांच्या नाटकांची ओळख करून देण्याबरोबरच त्यांच्या विनोदी शैलीची झलकही आजच्या प्रेक्षकांसमोर येईल, या उद्देशाने हे नाटक केले, अशी माहिती दिग्दर्शक अनंत अंकुश यांनी  व्यक्त केली.

मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay tendulkars drama newly again on stage
Show comments