तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील सहा ग्रामपंचायतींवर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक, न. पा.वाडी, आडगाव खुर्द, रांजणखोल, निघोज व लोहगाव या ६ ग्रामपंचायतींची आज येथील तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. लोहगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली. सावळीविहीर व रांजणखोलमध्ये १३ पैकी ११ जागा मिळवत विखे गटाने वर्चस्व राखले, तर न.पा.वाडी येथे सत्तांतर होऊन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रभान धनवटे यांच्या गटाचा धुव्वा उडाला. येथे आमदार अशोक काळे व विखे गटाच्या अशोक धनवटे गटाने ९ पैकी ८ जागा जिंकल्या. आडगाव खुर्दमध्ये विठ्ठल शेळके यांच्या मंडळाला पाच, तर बाबासाहेब शेळके गटाला अवघ्या दोन जागा मिळाल्या. निघोजमध्ये विखे गटाच्या दोन मंडळांत लढत होऊन काशिनाथ मते यांच्या मंडळाने ९ पैकी ६ जागा मिळवत सत्तांतर घडवले.
राहात्यातील ग्रा.पं.वर विखे गटाचे वर्चस्व
तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील सहा ग्रामपंचायतींवर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक, न. पा.वाडी, आडगाव खुर्द, रांजणखोल, निघोज व लोहगाव या ६ ग्रामपंचायतींची आज येथील तहसील कार्यालयात मतमोजणी झाली.
First published on: 28-11-2012 at 01:53 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikhe group lead on rahata village panchyat election