तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील सहा ग्रामपंचायतींवर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक, न. पा.वाडी, आडगाव खुर्द, रांजणखोल, निघोज व लोहगाव या ६ ग्रामपंचायतींची आज येथील तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. लोहगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली. सावळीविहीर व रांजणखोलमध्ये १३ पैकी ११ जागा मिळवत विखे गटाने वर्चस्व राखले, तर न.पा.वाडी येथे सत्तांतर होऊन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रभान धनवटे यांच्या गटाचा धुव्वा उडाला. येथे आमदार अशोक काळे व विखे गटाच्या अशोक धनवटे गटाने ९ पैकी ८ जागा जिंकल्या. आडगाव खुर्दमध्ये विठ्ठल शेळके यांच्या मंडळाला पाच, तर बाबासाहेब शेळके गटाला अवघ्या दोन जागा मिळाल्या. निघोजमध्ये विखे गटाच्या दोन मंडळांत लढत होऊन काशिनाथ मते यांच्या मंडळाने ९ पैकी ६ जागा मिळवत सत्तांतर घडवले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा