श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुसानिमित्त छत्रपती शाहू कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात दिल्लीच्या गुरू हनुमान आखाडय़ाचा तसेच भारत केसरी विकी ऊर्फ विक्रांत माने याने पंजाब केसरी नवनीत याच्यावर केवळ पाच मिनिटांतच आकडी डावावर मात केली. याप्रसंगी. १६५ कुस्त्या लावण्यात आल्या.
 द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत शाहू साखरचा उपमहाराष्ट्र केसरी नंदकुमार आबदार याने २३व्या मिनिटास आटपाडीचा राजेंद्र राजमाने याच्यावर घुटना डावावर विजय मिळविला, तर तृतीय क्रमांकाच्या लढतीत कर्नाटक केसरी पै. संजय माने व महाराष्ट्र चॅम्पियन पै. दशरथ कर्णवर यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
यशवंत किल्ल्य़ाच्या आखाडय़ात झालेल्या कुस्ती मैदानाचे पूजन ए. एल. लाड व रामचंद्र शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी समरजितसिंह घाटगे प्रमुख उपस्थित होते
विजयी मल्ल असे- संतोष दोरवड (शाहूपुरी) कौतुक डाफळे (शाहू साखर), दिलीप पाटील (बिळाशी), मनोज चव्हाण (वारणा), बाळू उंडी (सांगली), हसन पटेल (शाहूपुरी), गोिवद सावंत (मळगे बुद्रुक, प्रशिक्षक राम सारंग, सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान झाले तर अशोक पायमल, महादेव लाड, भगवान गुरव, छगन जांभळे, श्यामराव लायकर यांनी परिश्रम घेतले. निवेदन शंकर पुजारी यांनी केले.

Story img Loader