लातूर महापालिकेच्या पुढाकारातून साई येथील मांजरा काठावर दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे भव्य स्मृतिस्थळ उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णा काठावर स्मृतिस्थळ आहे. त्या धर्तीवर मांजरा काठावर विलासरावांचे स्मृतिस्थळ उभारले जाणार आहे. महापौर स्मिता खानापुरे यांच्या अध्यक्षतेखाली मनपाची सर्वसाधारण सभा पार पडली. सभेत सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी स्मृतिस्थळ उभारण्यास संमती दर्शविली. राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल माकणीकर यांनी हे स्मृतिस्थळ लोकसहभागातून विकसित करावे, अशी मागणी करून त्यासाठी एक लाख रुपयांची देणगीही जाहीर केली.
साई पर्यटनस्थळाच्या काही जागेबाबत असलेला वाद सोडवून पूर्ण जागा अधिग्रहित करावी. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वास्तुशिल्पकाराची नेमणूक करून उत्तम आराखडा तयार केला जाईल व या स्मृतिस्थळासाठी राज्य सरकारकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी बठकीत सांगितले. मकरंद सावे, चंद्रकांत चिकटे, सुनीता चाळक, अॅड. समद पटेल, लक्ष्मण कांबळे आदी नगरसेवकांनी ठराव उचलून धरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा