माहितीच्या दिरंगाईबद्दल तालुक्यातील नवलेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एस. एस. जाधव यांना राज्य माहिती आयोगाने पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांच्या वेतनातून हा दंड वसूल करण्याचाही आदेश या निकालात देण्यात आला आहे.
नगर येथील अभय जोशी यांनी याबाबतची तक्रार दाखल केली होती. नवलेवाडी येथे त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. त्याच्याशी संबंधित अभिलेखाची माहिती त्यांना हवी होती. त्यासाठी गेल्या वर्षी त्यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता. मात्र जाधव यांनी योग्य माहिती न देता दिशाभूल करणारे उत्तर दिले होते. जोशी यांनी यासंदर्भात प्रथम जनअपीलीय अधिकारी म्हणून तालुका गटविकास अधिकाऱ्याकडे अपील दाखल केले होते. त्यातही माहिती उपलब्ध करून देण्याचा आदेश झाला होता. मात्र, जाधव यांनी त्याचीही दखल घेतली नाही, उलट माहिती देण्यास टाळाटाळाच केली. जोशी यांनी त्यावर राज्य माहिती आयोगाच्या नााशिक खंडपीठात दाद मागितली होती. त्याचा निकाल देताना माहिती आयुक्त पी. डब्ल्यू. पाटील यांनी वरीलप्रमाणे आदेश दिला.
माहितीच्या दिरंगाईबद्दल ग्रामसेवकाला पाच हजारांचा दंड
माहितीच्या दिरंगाईबद्दल तालुक्यातील नवलेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एस. एस. जाधव यांना राज्य माहिती आयोगाने पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांच्या वेतनातून हा दंड वसूल करण्याचाही आदेश या निकालात देण्यात आला आहे.
First published on: 25-01-2013 at 04:22 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Village servent punished five thousand due to delay in information