वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायतीचा पदभार न देण्याच्या कारणावरून सेनगाव तालुक्यातील वलाणा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व्ही. के. खोडके यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. आदेशाचे पालन न केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
ग्रामसेवक खोडके यांनी त्यांचा पदभार ग्रामविकास अधिकारी आर. के. पट्टेबहाद्दूर यांच्याकडे देण्याच्या सूचना गटविकास अधिकारी साहेबराव कांबळे यांनी दिल्या. मात्र, खोडके यांनी पदभार दिला नाही. पट्टेबहाद्दूर यांनी गटविकास अधिकाऱ्यांचे याबाबत लक्ष वेधले. त्यानंतर खोडके यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. पदभार न दिल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Story img Loader