भोकर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे विनोद चिंचोळकर यांची बिनविरोध निवड झाली.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या भोकर पालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. नगराध्यक्ष पदासाठी विनोद चिंचाळकर, नागनाथ घिसेवाड व सुभाष गौड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. घिसेवाड व गौड यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने चिंचाळकर यांची निवड निश्चित होती. शनिवारी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत नगराध्यक्षपदी चिंचाळकर व उपनगराध्यक्ष साबेरा बेगम इनामदार यांच्या निवडीची घोषणा झाली. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल, तसेच घिसेवाड व गौड यांनी सहकार्य केल्याने चिंचाळकर यांनी सर्वाचे आभार मानले. आपल्या कारकीर्दीत जास्तीत-जास्त चांगली कामे होतील, या दृष्टीने प्रयत्न करू. सामान्यांचे छोटे-छोटे प्रश्न त्वरित सुटावेत यासाठी आपण विशेष प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
भोकर पालिका अध्यक्षपदी विनोद चिंचोळकर बिनविरोध
भोकर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे विनोद चिंचोळकर यांची बिनविरोध निवड झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या भोकर पालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले.
First published on: 11-11-2012 at 12:39 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod chincholker win with no oppsition in bhoker corporation election