भोकर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे विनोद चिंचोळकर यांची बिनविरोध निवड झाली.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या भोकर पालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. नगराध्यक्ष पदासाठी विनोद चिंचाळकर, नागनाथ घिसेवाड व सुभाष गौड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. घिसेवाड व गौड यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने चिंचाळकर यांची निवड निश्चित होती. शनिवारी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत नगराध्यक्षपदी चिंचाळकर व उपनगराध्यक्ष साबेरा बेगम इनामदार यांच्या निवडीची घोषणा झाली. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल, तसेच घिसेवाड व गौड यांनी सहकार्य केल्याने चिंचाळकर यांनी सर्वाचे आभार मानले. आपल्या कारकीर्दीत जास्तीत-जास्त चांगली कामे होतील, या दृष्टीने प्रयत्न करू. सामान्यांचे छोटे-छोटे प्रश्न त्वरित सुटावेत यासाठी आपण विशेष प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा