महापौर शीला शिंदे व महानगरपालिकेचे आयुक्त विजय कुलकर्णी यांनी आज अमरधामची पाहणी केली. येथील अंतर्गत नुतनीकरणाच्या कामात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महपौरांनी यावेळी दिला.
या प्रभागाचे नगरसेवक गणेश कवडे यांच्यासह बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम यांनी अलिकडेच अमरधामातील गैरसोयींबद्दल आयुक्तांना निवेदन देऊन तातडीने दुरूस्तीची मागणी करीत त्यासाठी आंदोलनाचाही इशारा दिला होता. महापौर व आयुक्तांनी आज ही पाहणी करून आवश्यक कामे तातडीने सुरू करून वेळेत पुर्ण करण्याच्या सुचना त्यांनी संबंधितांना दिल्या. मुख्य प्रवेशद्वाराजवळील रस्त्याचे काँक्रिटीकरण, महिलांसाठी स्नानगृह, प्रेत जाळण्याच्या जागेवर नविन लोखंडी कठडे, दशक्रिया विधीसाठी ओढा बांधणे आदी कामे येथे करण्यात येणार आहेत.      

Story img Loader